Posts

समाज सुधारक व त्यांची कार्य

Image
समाज सुधारक व त्यांची कार्य  1) गोपाळ गणेश आगरकर -    हे,  भौतिकता  -  ऐहिकता ,  बुद्धिप्रामाण्य ,  व्यक्तिस्वातंत्र्य  या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने  समाज सुधारणांचा  पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. 2) डॉ. भीमराव रामजी आंबेडकर -   ( १४ एप्रिल   १८९१  –  ६ डिसेंबर ,  १९५६ ) हे जागतिक दर्जाचे  भारतीय  अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री,  मानवी हक्कांचे  कैवारी आणि  बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलि...

भारतीय समाजसुधारक

भारतीय समाजसुधारक भीमराव आंबेडकर महात्मा गाँधी विनोबा भावे बाबा आम्टे ईश्वरचंद्र विद्यासागर धोंडो केशव कर्वे विट्ठल रामजी शिंदे गोपाल गणेश आगरकर विनायक दामोदर सावरकर राजा राममोहन राय सावित्रीबाई फुले स्वामी केशवानन्द स्वामी दयानन्द सरस्वती
Image
Dr.Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक जागृती ‘‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’’ असा धारदार व महान संदेश दिला.
Image
 समाज सुधारक व त्यांचे कार्य  जोतीराव गोविंदराव फुले -  ( एप्रिल ११ ,  इ.स. १८२७  -  नोव्हेंबर २८ ,  इ.स. १८९० ) हे  मराठी   लेखक , विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी  सत्यशोधक समाज  नावाची संस्था स्थापन केली;  शेतकरी  आणि  बहुजन  समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना  महात्मा  ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना महात्मा फुले म्हणे. शैक्षणिक कार्य महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. “ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। ” बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुध...